Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Supriya Sule devendra fadnavis

पिंपरी: Supriya Sule On Devendra Fadnavis | महाविकास आघाडीचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशीत आयोजित महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ‘दाेन पक्ष फाेडल्याचा कसला अभिमान बाळगता’, असा सवाल सुळे यांनी केला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या ४० आमदारांना प्रत्येकी ५० काेटी रुपये दिले, असे दाेन हजार काेटी रुपये खर्च करून सरकार पाडले. असे असताना दाेन पक्ष फाेडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. दाेन पक्ष फाेडल्याचा कसला अभिमान बाळगता, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. (Supriya Sule On Devendra Fadnavis)

” कारवाईपासून वाचण्यासाठीच अजित पवार आणि त्यांच्यासाेबतचे आमदार भाजपबराेबर गेले आहेत. भाजपबराेबर गेल्यापासून त्यांना शांत झाेप लागते. ‘ईडी’ची धाड टाकायची आणि पक्षात घ्यायचे. हे भाजपचे राजकारण सुरू आहे. पळपुटे पळून गेले, मात्र, आम्ही माेडू पण दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही”, असेही सुळे यांनी म्हंटले.

त्या पुढे म्हणाल्या, ” भाेसरीचे भाजपचे उमेदवार २० तारखेनंतर आपले खरे रूप दाखविण्याची धमकी देत आहेत. त्यांनी एका व्यक्तीला जरी धमकी द्यावी, भिती दाखवावी. महिला लाटणे घेऊन मागे लागतील. धमक्यांचा काळ आता गेला. ते जेवढ्या धमक्या देतील, तेवढी गव्हाणे यांची मते वाढतील, असेही सुळे यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed