Supriya Sule On Ladki Bahin Yojana | कार्यक्रमाला न आल्यास अर्ज रद्द करण्याचा ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना इशारा, सुप्रिया सुळे भडकल्या, एक जरी…
मुंबई : Supriya Sule On Ladki Bahin Yojana | | लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम आज पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित होत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत लाभार्थी महिलांना जो मेसेज पाठवण्यात आला आहे, त्यावरून वादाला तोंड फुटले आहे. हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करून खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. (Supriya Sule On Ladki Bahin Yojana)
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांनुसार अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. मात्र आता खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात शेयर केलेल्या पोस्टनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’वर एक फोटो शेयर केला असून त्यासोबतच्या मजकुरात म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणार्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ’भाऊ’ म्हणवित आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार…
अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ’बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं.
बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही.
पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा.
हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणार्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच,
असे सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासंदर्भातील तो वादग्रस्त मजकूर काय आहे…
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी एक्सवर ज्या मजकुराचा फोटो शेयर केला आहे त्यामध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे अॅप्रुव्हड मेसेज आला आहे त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे. यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे.
तसेच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे. शनिवारी सकाळी 9.30 वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे सर्वांनी येणे आवश्यक आहे. ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल, असे या मजकुरात म्हटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन