Supriya Sule On Mahayuti Govt | लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर सुप्रिया सुळेंची टीका, बहिणीचं नातं भावांना कळलंच नाही, ते 1500 रुपयांत…

Supriya Sule

मुंबई : Supriya Sule On Mahayuti Govt | लोकसभेपर्यंत कुणालाही त्यांची बहीण आठवली नाही. निकालानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या. पण दुर्दैव एका गोष्टीचे वाटते की, बहिणीचे नाते हे आमच्या भावांना कळलेच नाही. ते प्रेम आणि व्यवसायात गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय आणि पैसे आणायचे नसतात, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. त्या मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात (Mahavikas Aghadi Melava) बोलत होत्या.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, व्यवसायात प्रेम नसते. कारण तिथे प्रेम आणले तर तोटा होईल. जर प्रेमात पैसे आणले, तर त्याला नाते म्हणत नाहीत. या सरकारचे दुर्दैव आहे की, त्यांना प्रेमात आणि पैशांतले अंतरच कळले नाही.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ते म्हणतात की, एक बहीण गेली तर हरकत नाही. आपण दुसर्‍या बहिणी आणू. 1500 रुपयांमध्ये विकत घेता येईल, इतके हे नाते विकाऊ नाही. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस बहीण-भावाच्या नात्याला किंमत लावण्याचे पाप या सरकारने केले आहे.

आमचे दोन वीर बंधू दोन दिवसांपूर्वी म्हणाले की, आमचे लक्ष आहे, कुठली बहीण कुठे मतदान करते.
म्हणजे यांच्या पोटातले ओठावर आले. सत्य कधी लपत नाही, अशी टीका सुळे यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, यांचे बहिणीशी प्रेमाचे नाते नसून मतांशी जोडलेले नाते आहे.
डिसेंबरमध्ये किती बुथवर किती महिलांची मते मिळाली, हे पाहून लाडकी बहीण योजनेचे पुढचे पैसे दिले जाणार आहेत.
तुम्ही एका जरी बहिणीचे पैसे परत घेऊन दाखवाच, मग पुढे काय करायचे ते आम्ही पाहू, असा इशारा सुळे यांनी दिला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

You may have missed