Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या – “संसदेत बोललं की नवऱ्याला आयकरची नोटीस येते”

Supriya Sule

पुणे : Supriya Sule | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा कलगीतुरा रंगू लागला आहे. दरम्यान संसदेत बोलल्यानंतर नवऱ्याला आयकरची नोटीस (Income Tax Notice) येते, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी जेव्हा-जेव्हा संसदेत बोलते तेव्हा तेव्हा माझ्या नवऱ्याला आयकर विभागाची नोटीस येते. यंदाच्या बजेट वेळच्या भाषणानंतरही माझे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली होती. ही पहिलीच वेळ नाहीये, मी संसदेत बोलले की नेहमीच येते. यात प्रश्नही एकसारखे असतात, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

आयकर विभाग, सीबीआय Central Bureau of Investigation (CBI) आणि ईडी Directorate of Enforcement (ED) सारख्या एजन्सी मुळे राजकीय विरोधकांचे फोन हॅक करण्यासाठी कोणत्या वेगळ्या ॲप्सची गरज नाही, असा टोलाही त्यांनी फोन हॅक झाल्यावरून लगावला.

मला अज्ञात नंबरवरून मेसेज आला होता. तो मी जेव्हा उघडला तेव्हा माझा फोन फ्रीज झाला.
माझी सहकारी आदिती हिचाही फोन हॅक झाला होता, असे त्या म्हणाल्या. या सरकारला दोन वर्षे झाली आहेत.
लाडकी बहीण योजना आधी का आणली नाही, आता का आणली.
या सरकारमध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढत असून आज भाजप हा भ्रष्टाचाराचा पक्ष बनला आहे,
असा आरोप सुळे यांनी केला. (Supriya Sule)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed