Supriya Sule WhatsApp Hack | खासदार सुप्रिया सुळेंचा फोन हॅक प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Supriya Sule

पुणे : Supriya Sule WhatsApp Hack | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमावरील ‘एक्स’ साईटवर (दि.११) पोस्ट करत दिली होती. खासदार सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) सायबर गुन्हे शाखेकडे (Pune Rural Cyber Crime Branch) सोपविण्यात आला आहे.

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक केल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते रविवारी (दि.११) हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. (Supriya Sule WhatsApp Hack)

समाजमाध्यमातील खाते हॅक करून हॅकरने ४०० डाॅलरची मागणी केली. याबाबतचा संदेश प्रसारित झाल्यानंतर सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत समाजमाध्यम चालक कंपनीशी संपर्क साधला.

त्यावेळी सुळे यांच्या समाजमाध्यमातील खात्याचे नियंत्रण हॅकरकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले.
सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते पूर्ववत झाले आहे.
हॅकरने सुळे यांच्यासह आणखी कोणाचे खाते हॅक केले का ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune News Railway Line | आता लोणावळ्याशिवाय मुंबई-पुणे असा प्रवास करता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या – “संसदेत बोललं की नवऱ्याला आयकरची नोटीस येते”

Yerawada Pune Crime News | अपघाताची नुकसान भरपाई देण्याच्या वादातून तरुणावर टोळक्याने केले कोयत्याने वार

Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये

You may have missed