Surendra Pathare | प्रभाग 03 (विमाननगर-लोहगाव) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे: Surendra Pathare | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या (ता. ३०) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना प्रभाग क्रमांक ०३ (विमाननगर-लोहगाव) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी भूषण जोशी यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला.
अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
अर्ज दाखल केल्यानंतर सुरेंद्र पठारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “विमाननगर-लोहगाव परिसरातील नागरिकांचा माझ्यावर व माझ्या कामावर असलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, महिला व युवकांसाठी संधी निर्माण करणे या आणि अशा विविध विकासाच्या मुद्द्यांवर भर देत ही निवडणूक लढवत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वातून प्रेरणा घेऊन प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.”
प्रभाग क्रमांक ०३ मधील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता असून पठारे यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकीय हालचालींना वेग आला आहे.
