Sushiben Shah On Badlapur School Girl Incident | बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या – “बदलापूर घटनेत पोलिसच खरी समस्या”

Badlapur School Girl Incident

मुंबई : Sushiben Shah On Badlapur School Girl Incident | बालहक्क संरक्षण आयोगाच्या Juvenile Justice Board (JJB) अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी बदलापुरातील घटनेवरून पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत. पॉक्सोसारख्या केसमध्ये तत्काळ गुन्हा दाखल करावाच लागतो. तेथे चौकशीचा काहीच प्रश्न नसतो. तरी देखील पोलीस चौकशी करत होते आणि तब्बल ११ तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

माझ्या मते येथेच खरी समस्या होती. पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करायलाच हवा होता. शाळा व्यवस्थापनानेही या प्रकाराची माहिती तत्काळ पोलिसांना द्यायला हवी होती, अशी टिप्पणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ऍड.सुशीबेन शहा यांनी केली आहे.

ऍड. सुशीबेन शहा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या, “मला ज्यावेळी कळलं त्यावेळी आमचे कर्मचारी पालकांबरोबर लगेच पोलीस स्टेशनला गेले होते. पॉक्सो केसमध्ये तत्काळ गुन्हा दाखल केला जातो तेथे चौकशीचा काही प्रश्नच नसतो. पण पोलिसांकडून चौकशी केली जात होती आणि तब्बल ११ तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हीच खरी समस्या होती. या घटनेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करायलाच हवा होता”, असे शहा यांनी सांगितले.

“मुळात तो जो माणूस होता तो पंधरा दिवस त्या शाळेत वावरत होता. शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात पुरुष कर्मचाऱ्याला कसा प्रवेश दिला गेला? कर्मचाऱ्यांची पार्श्वभुमी न तपासता कसं तुम्ही कंत्राट देऊ शकता? ठाण्यात अशीच घटना घडली होती त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत मुलं शाळेत आहेत आणि शाळेच्या गणवेशात असतील तोपर्यंत त्या मुलांची जबाबदारी शाळेचीच आहे.

शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.
जवळपास दोन कोटी मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत.
सगळ्यांनीच आपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे”,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आताचं राज्य सरकार नक्कीच संवेदनशील आहे. त्यांच्याकडून या प्रकरणात कठोर कारवाई होईलच,
असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?