Swami Avimukteshwaranand On PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींचे नाव घेत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा घणाघात; म्हणाले – ‘… मग त्यांनीही धार्मिक बाबीत लुडबुड करता कामा नये’

Swami Avimukteshwaranand On PM Narendra Modi

मुंबई : Swami Avimukteshwaranand On PM Narendra Modi | ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देत उद्धव ठाकरे यांच्याबाबत विश्वासघात केल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

ते म्हणाले, ” मी ठाकरे कुटुंबीयांच्या विनंतीनुसार येथे आलो. त्यांनी माझं स्वागत केले. आम्ही सर्वजण हिंदू धर्म व सनातन धर्म पालन करणारे आहोत. आपल्याकडे पाप-पुण्याची भावना सांगण्यात आली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप आहे. पण त्याहून मोठा घात हा विश्वासघात आहे. हाच घात उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाला आहे. ही वेदना अनेकांच्या मनात आहे. ही वेदना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईपर्यंत दूर होणार नाही. कुणाचे हिंदुत्व अस्सल आहे आणि कुणाचे नकली हे जाणून घ्यावे लागेल.

जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदूच असणार. ज्या लोकांनी विश्वासघात केला ते हिंदू असू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला. महाराष्ट्रातील समस्त जनतेला ही वेदना ठावूक आहे. लोकसभा निवडणुकीतही ही गोष्ट सिद्ध झाली आहे. ज्यांनी विश्वासघात केला, त्यांनी जनतेच्या मताचाही अनादर केला होता. सरकारला मध्येच फोडायचे आणि जनतेच्या मताचा अनादर करणे, हे योग्य नाही”, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते.

त्यांच्या या वक्त्यव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. माध्यमांनी त्यांना संन्यासी असून राजकीय भाष्य कसे काय करता? असा प्रश्न विचारला आहे. यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राजकारण्यांनाच आव्हान दिले आहे.

ते म्हणाले, ” मी संन्यासी आहे. त्यामुळे राजकीय भाष्य करणे मी टाळले पाहीजे, हे खरे आहे. मात्र हाच नियम राजकीय पुढाऱ्यांनाही लागू होतो. त्यांनीही धार्मिक बाबीत लुडबुड करता कामा नये. पंतप्रधान मोदी मंदिरात येऊन प्राणप्रतिष्ठा करू लागले, तर माध्यमे त्याचे थेट प्रक्षेपण करतात. जर शंकराचार्य मंदिर आणि धर्माबाबत बोलले तर तुम्ही आम्हालाच उलट ज्ञान देत आहात. राजकारण्यांनी धर्मात हस्तक्षेप करणे बंद करावे, आम्ही गॅरंटी देतो की, आम्हीही राजकारणाबाबत बोलणे बंद करू.”

ते पुढे म्हणाले, “तुम्ही आमच्या धर्मात वारंवार हस्तक्षेप करत आहात आणि आम्ही धर्माच्या बाबतही बोलायचे नाही का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “राजकारणी जर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत असतील त्यांनी धर्माचे पालन करायला हवे.
धर्माचे मर्म जाणून घेऊन ते आचरणात आणणारेच खरे हिंदू असतात.
धर्माचाऱ्याने वेळोवेळी धर्माची व्याख्या करणे गरजेचे आहे, अन्यथा धर्माचाऱ्याने त्याचे काम केले नाही, असे होईल.
म्हणून मी वेळोवळी धर्माची व्याख्या करत असतो” असेही ते म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला त्यावेळी ही प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसार होत नसल्याचा दावा करत
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह अन्य काही शंकराचार्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे जोरदार समर्थन केले होते. (Swami Avimukteshwaranand On PM Narendra Modi)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed