Swargate Pune Crime News | तू बडे नेते हो गये क्या? मेरा भाई यहा का बडा भाई है, म्हणत तरुणावर कात्रीने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

swargate police

पुणे : Swargate Pune Crime News | अण्णाभाऊ साठे जयंती जोरदार साजरी केल्याने आपल्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याच्या समज करुन घेऊन एकाने तरुणावर कात्रीने डोक्यात वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयतन केला. (Attempt To Murder)

स्वारगेट पोलिसांनी शाकीर मेहबुब शेख (वय ४३, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी – Gultekdi) याला अटक केली आहे. याबाबत अतीश सतीश आडागळे (वय २९, रा. औद्योगिक वसाहत गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना गुलटेकडीमधील औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी रात्री सव्वाअकरा वाजता घडली. (Attack On Youth)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मानलेल्या बहिणीबरोबर रात्री गप्पा मारत उभे होते. त्यावेळी शाकीर शेख त्यांच्याजवळ आला़ व बोलला की, ”अण्णाभाऊ साठे जयंती तुमने बोहत बडी साजरी किया. तुम बडे नेते हो गये क्या, तुम्हारी औकात है क्या” असे म्हणून त्याने हातातील कपडे कापायच्या कात्रीने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. कात्रीच्या पुढील टोकाने जोरजोरात दोन तीन ठिकाणी मारुन जखमी केले. फिर्यादी जखमी झाल्याने वस्तीतील इतर लोक आले असताना त्यांना शाकीर बालु लागला की ”अगर तुम बिच मे आये तो तुम्हारा भी हाल इसके जैसा करुंगा,” असे म्हणत फिर्यादी यांना पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहण करुन लागल. ( Swargate Pune Crime News)

त्यात त्यांच्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले. ”कोणीही मध्ये येऊ नका,
नाही तर तुम्हाला देखील मी जीवे मारील, मेरा भाई यहा का बडा भाई है,” अशी धमकी दिली.
फिर्यादीच्या आईवडिलांनी त्यांना सोडवून उपचारासाठी रुग्णालयात नेले.
पोलिसांनी शाकीर शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सुभाष राठोड तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed