Swargate Pune Crime News | पुणे: स्वारगेट परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली भलताच ‘धंदा’ करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : Swargate Pune Crime News | मसाज सेंटरच्या नावाखाली (Massage Centres In Pune) वेश्या व्यवसायाकरीता (Prostitution Racket) मुली ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेणार्या महिलेला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
हा प्रकार स्वारगेट येथील आकृती चेंबरमधील श्रेया (विरा) आर्युवेदिक मसाज सेंटर येथे शनिवारी दुपारी २ वाजता घडला. याबाबत पोलीस हवालदार प्रिती सचिन मोरे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कात्रज (Katraj) परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेवर आणि संतोष सर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील विरा आर्युवेदिक मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. दोघे आरोपी पिडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून मसाज सेंटरमध्ये पुरुष ग्राहकांना बोलावून पिडित महिलांवर नियंत्रण ठेवून देहविक्री करत. त्यांची कमाई स्वत:च्या उपजिविकेसाठी वापरुन त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत होते.
मसाज सेंटरचा उपयोग कुंठणखाना चालविण्याकरीता करताना मिळून आले.
पोलीस उपनिरीक्षक सुभाष राठोड (PSI Subhas Rathod) तपास करीत आहेत. (Swargate Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात