Swargate Pune Crime News | रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यालयात बसवून ठेवून महिलेचा विनयभंग; कुणाल गुलाटी, रणजित ऊर्फ विनोद ताले विरुद्ध FIR दाखल

Molestation-Case

पुणे : Swargate Pune Crime News | कार्यालयात बोलावून रात्री ११ वाजेपर्यत महिलेला बसवून ठेवले. तिच्याकडे वाईट नजरेने पाहून हात हातात घेऊन अश्लिल बोलून विनयभंग (Molestation Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAQ-wzpi0v5

कुणाल रवी गुलाटी Kunal Ravi Gulati (वय ३१, रा. बालेवाडी) आणि रणजित ऊर्फ विनोद ताले Ranjit Alias Vinod Tale (वय ४७, रा. पूनम पार्क, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार महर्षीनगर येथील संध्यानील सोसायटीमध्ये (Sandhyanil Society Maharshi Nagar) २७ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री दहा वाजता घडला होता.

https://www.instagram.com/p/DAQ7SNpigQX

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना कुणाल गुलाटी व रणजित ताले यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवून घेतले. रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये बसवून ठेवले. फिर्यादीकडे दोघांनी वाईट नजरेने पाहून कुणाल याने फिर्यादीचा हात हातात घेतला. तेव्हा फिर्यादी यांनी आरोपीचा हात त्याच्या हातातून झटकून आरोपीला म्हणाल्या की, तुम्ही माझा हात का पकडला. यावर रणजित ताले बोलला की फक्त हातच तर पकडला आहे, एवढे काय होते. दोघांच्या अशा वागणुकीमुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्याबाबत फिर्यादी यांनी आता तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील (PSI Poonam Patil) तपास करीत आहेत. (Swargate Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAQ2EiPpg9K

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

You may have missed