Swargate Pune Traffic Updates | स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल
पुणे : Swargate Pune Traffic Updates | विधानसभा निवडणुक २०२४ च्या कामकाजाच्या अनुषंगाने गणेश कला क्रीडा रंगमंच (Ganesh Kala Krida Manch) स्वारगेट येथून मतदान प्रक्रियेच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पी.एम.पी.एम.एल बसेसच्या (PMPML Buses) वाहनतळाकरीता जागा उपलब्ध व्हावी, तसेच पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता १९ व २० नोव्हेंबर २०२४ रोजी स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत (Swargate Traffic Division) वाहतुकीत बदल करण्यात येत आहे.
स्वारगेट ते नेहरु स्टेडियम दरम्यानचे रस्त्यावर १९ नोव्हेंबर रोजी ६ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच २० नोव्हेंबर रोजी सांय ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारी वाहतूक हॉटेल नटराजकडील लेनवर प्रवेश बंद येणार आहे. नागरिकांना जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यासाठी ओव्हरब्रिज खालील डावीकडील लेनने इच्छित स्थळी जाता येणार आहे.
सोलापूर रोडने जेधे चौक अंडरपासने सारसबागेकडे (Sarasbaug) जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. नागरिकांना सोलापूर रोडने येणाऱ्या वाहनांनी जेधे चौक ओव्हर ब्रीज खालील डावीकडे वळण घेऊन होल्गा चौकामध्ये उजवीकडे वळण घेवुन इच्छित्त स्थळी जाता येणार आहे, असे पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे (Amol Zende) यांनी कळविले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध