Swargate Rape Case | दत्ता गाडेने 22 हजार वेळा बघितले अश्लील व्हिडीओ; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर

पुणे: Swargate Rape Case | दत्ता गाडे Datta Gade (वय-३७, रा. गुनाट, शिरूर) या आरोपीने स्वारगेट एसटी स्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास तरुणीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ६४ (बलात्कारासाठी शिक्षा), ६४ (२) (एम) वारंवार बलात्कार. ३५१ (२) (धमकावणे), ११५ (२) (जाणीवपूर्वक दुखापत पोहोचविणे) व १२७ (२) (डांबून ठेवणे) या कलमांनुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)
या प्रकरणी ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला पोलिसांनी विरोध केला असून, त्याची कारणमीमांसा करणारा अर्ज शुक्रवारी न्यायालयात सादर केला.
दरम्यान आता आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेने मागच्या वर्षभरात तब्बल २२ हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली आहे.