Swargate Rape Case | पुणे: स्वारगेट प्रकरणातील पीडित तरुणीचा प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

Datta Gade

पुणे : Swargate Rape Case | स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी (दि. २५) सकाळी साडेपाचच्या सुमारास प्रवासी तरुणीला धमकावून दत्ता रामदास गाडे (Datta Ramdas Gade) या नराधमाने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पीडित मुलीवरही विविध आरोप होत आहेत. दरम्यान अत्याचार झालेल्या तरुणीचे चारित्र्यहनन करणाऱ्या खोट्या व असंवेदनशील वक्तव्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी तिच्या वकिलांनी केलेला प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. (Swargate Bus Stand)

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार, जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारने दिले आहेत, असे नमूद करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी हा अर्ज फेटाळला आहे.

सदर तरुणीच्या अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर काही राजकारणी, पोलिस अधिकारी यांच्याकडून तरुणीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी विधाने करण्यात आली होती. त्यामुळे तरुणीचे चारित्र्यहनन करणाऱ्या अवमानजनक, असंवेदनशील व दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश न्यायालयाने द्यावा, असा अर्ज तरुणीचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी केला होता.

या अर्जावर नुकतीच सुनावणी झाली. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार, उपद्रव किंवा संभाव्य धोक्याच्या अथवा तातडीच्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारने जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना आदेश काढण्याचे विशेष अधिकार दिले आहेत. या न्यायालयाला असे अधिकार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचे उदाहरण याप्रकरणी लागू होत नाही, असे नमूद करत न्यायालयाने तरुणीच्या वकिलांचा अर्ज फेटाळला आहे.

पीडित तरुणीचे वकील असीम सरोदे म्हणाले, ” तरुणीच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे व तिचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये रोखण्यासाठी मनाई आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे.” (Swargate Rape Case)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

You may have missed