Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’; शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena

मुंबई : Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झालेली आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा हे मागील काही कालावधीपासून राजकारणापासून दूर आहेत. एन्काउंटर स्पेशलिस्ट (Encounter Specialist) म्हणून ओळख असलेले प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

प्रदीप शर्मा यांनी २०१९ साली शिवसेनकडून हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर अँटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मा यांचे नाव चर्चेत आले होते.

शर्मा यांच्यावर २००६ मध्ये कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याचा बनावट एन्काउंटर केल्याचा (Lakhan Bhaiya Fake Encounter) आरोप आहे. याप्रकरणी शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.

प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा राजकारणात प्रवेश केला. आज शेकडो गाड्यांसह त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. स्वीकृती शर्मा आगामी विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून (Andheri East Assembly Constituency) निवडणूक लढण्याची चर्चा सुरू आहे. (Swikruti Pradeep Sharma Join Shivsena)

प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळचे असल्याचे बोलले जाते.
स्वीकृती शर्मा यांच्या पत्नीचे विधानसभेसाठी तिकीट निश्चित मानले जात आहे.
मात्र स्वीकृती शर्मा कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप स्पष्ट नाही.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’