Tadipar Criminal Arrested | तडीपारीचा आदेशाचा भंग करुन शहरात वावरणार्‍या तडीपार गुंडाकडून २ पिस्टल, ४ जिवंत काडतुसे हस्तगत

pistol

पुणे / पिंपरी : Tadipar Criminal Arrested | तडीपारीचा आदेशाचा भंग करुन शहरात वावरणार्‍या गुंडाकडून मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने २ पिस्टल, ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मेघराज अजित यादव Meghraj Ajit Yadhav (वय २३, रा. कात्रज गावठाण, मुळ रा. बझरवाडी, ता. भोर) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलीस अंमलदार हर्षद जयवंत कदम यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना मोशी टोलनाक्याजवळ मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गस्त घालत होते. त्यावेळी तडीपार गुंड पिस्टल घेऊन वावरत असल्याची बातमी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोशी टोलनाक्याजवळ शिवाजीवाडी चौकाच्या अलीकडे मोटारसायकलसह मेघराज यादव उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी प्लॅटिना मोटारसायकलसह १ लाख ४४ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत. (Tadipar Criminal Arrested)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)

Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या