Tasgaon Assembly Constituency | सांगली विधानसभेच्या आखाड्यात रोहित पाटलांच्या विरोधात प्रभाकर पाटील?, भाजप नेता हाती घड्याळ बांधत तुतारीला आव्हान देणार

Rohit Patil-Prabhakar Patil

सांगली: Tasgaon Assembly Constituency | सांगलीच्या तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघाची जागा महायुतीत (Mahayuti) राष्ट्रवादी अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात रोहित पाटील (Rohit Patil) विरुद्ध प्रभाकर पाटील (Prabhakar Patil) असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

हा मतदारसंघ माजी गृहमंत्री कै. आर.आर. पाटील (RR Patil) यांचा गड मानला जातो. सध्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील (Sumantai Patil) या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार आहेत (Sharad Pawar NCP). मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मुलगा रोहित पाटील हे मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्याची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या पराभवानंतर संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil)विधानसभेच्या मैदानात उतरतील, अशी शक्यता होती. मात्र रोहित पाटील या तरुणासमोर स्वतः उतरण्याऐवजी ते मुलाला उतरवत आहेत. यामुळे त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

आगीत काही वर्षांपासून प्रभाकर पाटील हेदेखील विधानसभेच्या दृष्टीने तयारी करत आहेत. मात्र महायुतीमध्ये तासगाव- कवठेमहांकाळची जागा भाजप ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने प्रभाकर पाटील हेच राष्ट्रवादीमध्ये दाखल होऊन हातात घड्याळ बांधतील; अशी चर्चा सुरू आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार संजयकाका पाटील हे मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत.
मुलाच्या उमेदवारीसाठी संजयकाका पाटील हे मुंबईत अजित पवार यांना देखील भेटले
असून अजित पवारांची त्यांच्याशी चर्चा देखील केल्याचे संजयकाका पाटील यांनी सांगितले आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत वादंग! ‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’,
भाजपचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी