Tax Free Income | येथून मिळाले असेल उत्पन्न तर एक पैसाही द्यावा लागणार नाही इन्कम टॅक्‍स, जाणून घ्या सविस्तर

500 indian rupee

नवी दिल्ली : Tax Free Income | प्रत्येक प्रकारच्या उत्पन्नावर सरकारला टॅक्स द्यावा लागत नाही. काही स्त्रोतांतून मिळणारे उत्पन्न सरकार करमुक्त ठेवते. बहुतांश लोक अनेक प्रकारे उत्पन्न मिळवतात, अशावेळी हे माहिती पाहिजे की, कोणत्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागतो आणि कोणत्या नाही. करमुक्त उत्पन्नाबाबत (Non-Taxable Income) जाणून घेवूया…

करमुक्त उत्पन्न ती कमाई आहे, ज्यावर तुम्हाला कर द्यावा लागत नाही. काही स्त्रोतांमधून झालेले उत्पन्न तुम्ही बाहेर ठेवू शकता. भारतात करमुक्त उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.

जर तुम्हाला आई-वडीलांकडून वारसागत काही मालमत्ता, दागिने अथवा रोख रक्कम मिळाली तर तुम्हाला कोणताही कर द्यावा लागणार नाही. जर तुम्हाला इच्छापत्रातून एखादी रक्कम मिळाली तरी सुद्धा कर द्यावा लागत नाही. मात्र, तुमची जी संपत्ती आहे, त्यामधून होत असलेल्या उत्पन्नावर कर द्यावा लागेल.

जर तुमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर मिळालेले पैसे करमुक्त आहेत. मात्र, वार्षिक प्रीमियम विमा रक्कमेच्या १०% पेक्षा जास्त असू नये. जर असेल तर तुम्हाला जास्त रक्कमेवर कर द्यावा लागेल.

प्राप्तीकर कायद्यानुसार, रक्‍ताच्या नातेवाईकांकडून मिळालेली भेट, जसे की संपत्ती, दागिने अथवा पैसे, करपात्र नाहीत.
नातेवाईक नसलेल्यांकडून मिळालेली भेट केवळ ५०,००० रुपयांपर्यंत करमुक्त आहे.
हिंदू अविभाज्य कुटुंबाकडून वारसागत मिळालेली संपत्ती अथवा भेट सुद्धा करमुक्त आहे.

जर तुम्ही आपल्या शेत जमिनीवर शेती अथवा त्यासंबंधी कामातून पैसे कमावत असाल तर हे उत्पन्न करमुक्त आहे.
यामध्ये शेतजमीन खरेदी करणे आणि विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाचा देखील समावेश आहे. (Tax Free Income)

ग्रॅच्युएटीवर सुद्धा प्राप्तीकर द्यावा लागत नाही. एम्प्लॉई निवृत्त झाल्यावर अथवा मृत्यू लाभ म्हणून मिळणारी रक्कम आहे.
सरकारी कर्मचारी यांच्यासाठी ही ग्रॅच्युएटी पूर्णपणे करमुक्त आहे.
खाजगी क्षेत्रातील एम्प्लॉईसाठी १० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युएटी करमुक्त आहे.

प्राप्तीकर कायदा कलम १०(१५) नुसार, सुकन्या समृद्धी योजना, स्थानिक प्राधिकरण आणि पायाभूत सुविधा बाँड,
तसेच गोल्‍ड डिपॉझिट बाँडमधून झालेल्या उत्पन्नावर देखील प्राप्तीकर द्यावा लागत नाही.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”