Taxpayers Do Common Mistake | ITR भरताना लक्षात ठेवा ‘या’ 8 गोष्टी, चुक झाली तर पडेल महागात, रिटर्न जाईल-दंड सुद्धा लागेल

Income Tax Return

नवी दिल्ली : Taxpayers Do Common Mistake | इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरण्याची शेवटची तारीख जसजशी जवळ येत आहे, करदात्यांची धावपळ वाढली आहे. अनेक लोक शेवटच्या वेळी आयटीआर भरतात आणि या घाईत त्यांच्याकडून चूका होतात. आयटीआर भरताना ८ प्रकारच्या चूका सर्वात जास्त होतात, त्या कोणत्या ते जाणून घेऊया…

१. आयटीआर फॉर्म भरताना वैयक्तिक माहिती जसे की, नाव, पॅन, पत्ता आणि बँक खात्याची माहिती सांभाळून आणि योग्य भरा. या चुकीमुळे तुमचे आयटीआर रिजेक्‍ट होऊ शकते.

२. चुकीचा आयटीआर फॉर्म भरणे ही एक नेहमी होणारी चूक आहे. तुमचे उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या आधारावर योग्य आयटीआर फॉर्म निवडा. यात काही चूक झाली तर तुमचा रिटर्न रद्द केला जाईल. दंड देखील लागू शकतो.

३. आयटीआरमध्ये उत्पन्नाविषयी चुकीची माहिती देत असाल तर सावध व्हा. आयटीआर फॉर्ममध्ये वेतन, व्याज, भाडे आणि गुंतवणुकीतून येणारे उत्पन्न याची पूर्ण माहिती द्या. पूर्ण माहिती न दिल्यास कर चोरीसाठी दंड लागू शकतो, आयटीआर सुद्धा रद्द होईल.

४. रिटर्न भरताना हे पहा की कंपनीने जो फॉर्म-१६ दिला आहे, त्यामध्ये दर्शवलेला टीडीएस तुमच्या फॉर्ममध्ये लिहिलेल्या टीडीएस इतकाच आहे अथवा नाही. टीडीएसची योग्य माहिती न दिल्यास दंड लागू शकतो.

५. आयटीआर फॉर्ममध्ये ८०सी, ८०डी अथवा ८०जी सह इतर सर्व प्रकारच्या गुंतवणुकीची माहिती देण्यासह यावर मिळत असलेल्या कर सवलतीची पूर्ण माहिती द्या. गुंतवणूक आणि करवलतीची योग्य माहिती न दिल्यास कर जास्त द्यावा लागेल.

६. आयटीआर फॉर्ममध्ये दिलेले स्‍टेटमेंट फॉर्म २६एएस सोबत क्रॉस चेक आवश्य करा.
यामध्ये टीडीएस, टॅक्‍स पेमेंट आणि इन्कम टॅक्स संबंधी इतर माहिती असते.
म्हणजेन आयटीआर फॉर्म सबमिट करण्यापूर्वी दोन्ही फॅक्‍ट तपासा.

७. आयटीआर सबमिट केल्याने काम पूर्ण होत नाही,
यानंतर इलेक्ट्रॉनिक प्रकारे पडताळणी सुद्धा करावी लागते.
जर पडताळणी म्हणजे व्हेरिफाय केले नाही तर आयटीआर रिजेक्‍ट होईल.

८. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयटीआर ठरलेल्या काळात भरा.
शेवटच्या वेळेची वाट पाहिलीत तर घाई होऊन चुका वाढू शकतात.
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै, २०२४ आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed