Telcom Companies Tariff Hikes | Jio, Airtel, Vodafone चे टेरि‍फ प्‍लान वाढवण्याचा काय होईल परिणाम? इतका वाढेल महागाई दर

Jio, Airtel, Vodafone

नवी दिल्ली : Telcom Companies Tariff Hikes | काही दिवसांपूर्वीच देशातील टॉप तीन टेलीकॉम कंपन्यांनी यूजर्सवर भार टाकत टेरि‍फ प्‍लानच्या दरात वाढ केली आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एयरटेल (Bharti Airtel) आणि वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) ने टेरि‍फ प्‍लानमध्ये तब्बल २७ टक्के वाढ केली आहे. टेरि‍फ प्‍लानचे दर वाढवल्याने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये महागाई दर ०.२० टक्के वाढू शकतो.

एका परदेशी ब्रोकरेज कंपनीने हा अंदाज वर्तवला आहे. डॉयचे बँकेच्या तज्ज्ञांनी मुख्य महागाई दर ०.२० टक्के वाढवून ३.८ टक्के केला आहे.

प्‍लानमधील वाढीचा परिणाम दिसणार जुलैपासून
मुख्‍य महागाई दरात अन्न आणि इंधनाचा प्रभाव समाविष्ठ होत नाही. त्यांनी म्हटले की, दरातील वाढीसह, कमजोर मान्सून पाऊस सुद्धा आणखी एक कारण आहे, जे महागाई दर वाढवण्याचे कारण होऊ शकते. (Telcom Companies Tariff Hikes)

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, टेलीकॉम टेरि‍फ प्‍लानमधील वाढीचा परिणाम जुलैपासून दिसण्यास सुरूवात होईल
आणि या वाढीने मंथ ऑन मंथ बेसवर मुख्य महागाई दरात ०.८५ टक्केपेक्षा जास्त वाढ होईल.
एकुणच, टेलीकॉम सेक्‍टरमध्ये टेरि‍फ वाढल्याने चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) मुख्‍य महागाई दर ०.२० टक्के वाढू शकतो.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”

You may have missed