Thane Crime News | भर रस्त्यात ज्वेलर्सच्या दुकानावरील गोळीबारात सेल्समनचा मृत्यू; व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

ठाणे : Thane Crime News | भर रस्त्यात ज्वेलर्स दुकानाच्या बाहेर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. दिनेशकुमार माणाराम चौधरी (वय-२५) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या सेल्समनचे नाव आहे. ही घटना ठाणे जिल्हातील शहापूर शहरालगतच्या गोठेघर हद्दीतील पंडीतनाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाच्या बाहेर घडली. या गोळीबाराच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Firing Ata Jewelers Shop)
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेशकुमार हा महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात सेल्समनचे काम करत होता. तो नेहमीप्रमाणे दुकान मालकासह शनिवारी (दि.२१) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दुकान बंद करून आपापल्या घरी निघाले होते. त्यांच्यासोबत दोन कामगार देखील दुकानात होते. सर्वजण दुकान बंद करून निघण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला.
यावेळी भाजी विक्री करणारी महिला मदतीसाठी धावली. तेव्हा दोन्ही हल्लेखोरांनी तिलाही धमकावले.
झालेल्या गोळीबारात चौधरी हे गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले.
मात्र, आज (दि.२२) पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन
घटनास्थळी श्वानपथक बोलावण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Thane Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत