The Poona Press Owners Association | प्रिंटींग क्षेत्रातील तंत्रज्ञान अवगत करण्याची आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन परिषदेत केले मार्गदर्शन
पुणे – The Poona Press Owners Association | प्रिंटींग क्षेत्रातील तंत्रज्ञानात सातत्याने वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी बदलाचा अंदाज घेउन तंत्रज्ञान अवगत करण्याची आवश्यकता आहे. संपुर्ण जग वेगाने पुढे जात असताना आपल्यालाही त्याचपद्धतीने शिकण्याची गरज असल्याचे मत, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase) यांनी व्यक्त केले. दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित एक दिवसीय ‘ अडॉपटेक परिषद शनिवारी (दि. २४) पार पडली. यावेळी दत्त बरूआ, के. राजेंद्रन, रवींद्र जोशी, राहूल मारूलकर, संजय सावंत, किशोर गोरे उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, जगभरात मागील २० वर्षांपासून तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने केला जात आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील चाकरमान्यांपासून उच्चपदस्थांना विविध बदलांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः प्रिंटींग क्षेत्रातील होणारे बदल काळाची नांदी असून, व्यावसायिकांनी त्याचे अवलोकन करणे फार गरजेचे आहे. आयुष्यात काही गोष्टी खूप महत्वाच्या असून त्यामध्ये क्षमता निर्माण करणे, ज्ञानाची व सामाजिकतेची ओढ कायम ठेवणे महत्वाचे आहे. त्यासोबतच कायम शिकत राहिल्यामुळे आपण ताजेतवाणे राहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहूल मारूलकर यांनी, प्रिंटींग क्षेत्रात होणारे नाविण्यपुर्ण बदल, तंत्रज्ञान, विविध संकटांबाबत माहिती देत उपस्थित व्यासायिकांना मार्गदर्शन केले.
उद्योजकांना प्रशिक्षण देणारे अनिल लांबा यांनी व्यावसायिकांना मैत्री आर्थिंक तालिकेद्वारे गुंतवणूक आणि नफ्याचे गणित उलगडून सांगितले. नियोजनाशिवाय उद्योगात गुंतविलेला पैसा शून्य ठरतो. त्यासाठी ताळेबंद तालिका तयार करणे गरजेचे आहे. आर्थिंक नियोजन चांगले नसल्यास, व्यावसाय डुबतात. जगभरात चुकीच्या अर्थनियोजनामुळे व्यावसाय बंद झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रिंटवीक प्रसिद्ध मासिकाचे संपादक रामू रामनाथन यांनी परिषदेत दोन मुलाखती घेत पॅनेलिस्टला बोलते केले. जर्मनीतील ड्रुपा प्रदर्शनात भाग घेतलेल्या भारतीय मशिनरी उत्पादकांचा सहभाग, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, ड्रुपा प्रदर्शनात परदेशी मशिनरींचा मुद्रण व्यावसायिकांना होणार्या फायद्याबद्दल त्यांनी चर्चा घडवून आणली. चर्चेत दत्ता देशपांडे, सी.एन. अशोक, अमित खुराणा, पी. साजिथ, आर. बजाज, समीर पाटकर, वेणूगोपाल मेनन, ए. अप्पादुराई, मनीष गुप्ता, सहभागी झाले होते. परिषदेत प्रेरणादायी मार्गदर्शक प्रिया कुमार यांच्यासह नामांकित वक्ते एस. एन. वेंकटरमन यांनी प्रिटींग क्षेत्रातील घडामोडीसह,तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले.
चौकट-मानसिकता बदलल्यास यशप्राप्ती- प्रेरणादायी मार्गदर्शक प्रिया कुमार
प्रिंटींग क्षेत्रात वेगाने आधुनिक बदल होत चालले आहेत. मात्र, आपणही मानसिकता बदलाची आवश्यकता असून,
त्याद्वारे यशप्राप्ती करता येते. बहुतांश व्यावसायिक द्विधा मनःस्थितीत अडकल्यामुळे व्यवसाय वाढीस लागत नाही.
त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रेरणादायी मार्गदर्शक प्रिया कुमार यांनी केले.
तसेच परिषदेत आयटीसीचे प्रमुख आणि नामांकित वक्ते एस. एन. वेंकटरामन यांनी व्यावसायिकांना प्रिटींग क्षेत्रातील घडामोडीसह, पेपरबोर्ड आणि स्पेशालिटी पेपर्स व्यावसायाबाबत मार्गदर्शन केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय