Theur Pune Crime News | पुणे: थेऊरमधून बांगलादेशी होमिओपॅथी डॉक्टरला अटक; 1972 पासून आईवडिलासह आला होता भारतात
पुणे : Theur Pune Crime News | पाकिस्तानातून बांगला देश स्वतंत्र झाल्यानंतर तो आईवडिलांबरोबर एक वर्षाचा असताना भारतात आला. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी राहिला. गेल्या २५ वर्षांपासून तो थेऊर येथे होमिओपॅथी डॉक्टर म्हणून काम करत होता. लोणी काळभोर पोलिसांनी त्याला बांगला देशी नागरिक असल्याच्या संशयावरुन अटक केली आहे. (Bangladeshi Doctor Arrested In Pune)
हारुलाल पंचानन बिश्वास (वय ५३, रा. काकडे बिल्डिंग, थेऊर, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार (API Amol Pawar) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारुलाल बिश्वास यांचा जन्म बांगला देशात झाला. पाकिस्तानपासून बांगला देश वेगळा झाल्यानंतर ते आईवडिलांबरोबर भारतात आले. देशात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे आईवडिल मोलमजुरी करुन रहात होते. त्यांनी मुंबई येथे होमिओपॅथीचे शिक्षण घेतले असल्याचा त्यांचा दावा आहे. गेली २५ वर्षे ते थेऊर येथे होमिओपॅथी डॉक्टर म्हणून काम करत आहेत.
हारुलाल बिश्वास हे बांगला देशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असताना त्यांनी आपला जन्म बांगला देशात झाल्याचे सांगितले.
बांगला देशी नागरिक असतानाही बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करुन त्यावरुन आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट,
रेशनकार्ड, निवडणुक आयोगाचे कार्ड ही बनावट कागदपत्रे तयार केली असल्याचे आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके (PSI Amol Ghodke) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Goyal Properties Pune | राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाचा गोयल प्रॉपर्टीज या बांधकाम कंपनीला दणका,
घर खरेदीदारांना दोन महिन्यात रक्कम सव्याज परत करण्याचे आदेश
Shivaji Road Pune Accident News | मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक;
लोकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात (Video)