Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Police-Suspended

पुणे : Three Cops Suspended In Pune | ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) वैद्यकीय तपासणी करुन पुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) घेऊन येत असताना मोक्क्यातील आरोपीने (Criminal In MCOCA Case) बेडीतून हात काढून घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांनी तिघांना निलंबित केले. (Three Cops Suspended In Pune)

पोलीस अंमलदार सुशांत राजेंद्र भोसले (Sushant Rajendra Bhosale), विठ्ठल बप्पाजी घुले (Vittal Bappaji Ghule), सुरज हिराचंद ओंबासे (Suraj Hirachand Ombase) अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

येरवडा पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये मोक्कातील गुन्ह्यात अटक केलेल्या तिघा आरोपींना ठेवण्यात आले होते. आरोपी निखिल मधुकर कांबळे Nikhil Madhukar Kamble (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हा सोमवारी २१ ऑक्टोंबर रोजी सकाळपासून पोटात दुखत असल्याची तक्रार करत होता. त्यामुळे त्याला व त्यांच्या दोन साथीदारांना घेऊन ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा आदेश या तिघांना देण्यात आला होता.

त्यानुसार त्यांनी तिघांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर परत पोलीस ठाण्यात येत असताना गुंजन चौकात कांबळे याने खूप त्रास होत आहे. पाणी द्या नाही तर मला काहीतरी होईल असे बोलून गयावया करु लागला. तेव्हा रात्री पावणे दहा वाजता पाणी आणण्यासाठी गाडी थांबविण्यात आली. त्याचवेळी निखिल कांबळे याने त्यांच्या डाव्या हातातील बेडीमधून हात अलगद काढून गाडीचा दरवाजा उघडून पलायन केले होते.

पोलीस दलासारख्या शिस्तप्रिय खात्यातील जबाबदारीचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे.
पोलिसांचे हे वर्तन बेशिस्त व बेजबाबदारपणाचे असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Constituency | जोरदार शक्तीप्रदर्शन आणि कोथरुडकरांची साथ ! चंद्रकांत पाटील यांनी दिग्गजांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज (Video)

Pune PMC News | आगीच्या घटनेमुळे मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची अग्निशामक दलामार्फत तपासणी मोहीम सुरु

Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू