Three Policemen Suspended In Pune | पोक्सोच्या धमकीपाठोपाठ सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन उकळली खंडणी, ३ पोलीस निलंबित; पुणे पोलिस दलात खळबळ

Pune Police News | PSI Ajit Bade, reel star Sonali Hinge, Sudam Tayde suspended for extorting money by fearing to implicate principal in POCSO crime

पुणे : Three Policemen Suspended In Pune | प्राचार्यांना पोक्सो गुन्ह्यामध्ये अडकवू, अशी धमकी देऊन ७ लाखांची खंडणी उकळण्याचे प्रकार उघडकीस आल्याच्या पाठोपाठ तरुणाला सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी तिघा पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे.

पोलीस हवालदार किरण अब्दागिरे (Kiran Abdagire Police), पोलीस अंमलदार गणेश खाडे (Ganesh Khade Police) आणि किरण कांबळे (Kiran Kamble Police) अशी निलंबित केलेल्या तिघा पोलिसांची नावे आहेत. हे तिघेही वाघोली पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

२ मार्च रोजी रात्री ९ वाजता वाघोली येथील झेड रेसिडेन्सी या ठिकाणी काही मुले रुममध्ये राहतात. ते रुमवर मुली आणून व्हिडिओ बनवितात, अशी शंका असणारा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. त्यानुसार वाघोली गावठाण बीट मार्शल गणेश महादेव खाडे आणि किरण भिकाजी कांबळे यांनी कॉलचे अनुषंगाने झेड रेसिडेन्सी या सोसायटीमधील सभासद यांच्याकडे चौकशी करुन एका २४ वर्षाच्या तरुणाला ठाणे अंमलदार किरण ज्ञानेश्वर अब्दागिरे यांच्या समोर हजर केले. हा तरुण मुळचा राजस्थान येथील आहे. पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. 

पोलीस हवालदार किरण अब्दागिरे यांनी तक्रारदार यांना तुमच्या विरुद्ध आलेल्या तक्रारीचे अनुषंगाने गुन्हा दाखल करुन सेक्स रॅकेटमध्ये अडकवितो, नोकरी घालवितो, तसेच नातेवाईकांना बोलावुन घेतो, अशा स्वरुपाच्या धमक्या दिल्या. गणेश खाडे यांनी तक्रारदार यांना हाताने चापट मारली. किरण कांबळे यांनी तक्रारदार यांच्या मैत्रीणीला विनाकारण ताटकळत ठेवुन चौकशी करुन कोणतीही कारवाई न करता तक्रारदार याच्याकडे पैशांची मागणी केली. तक्रारदार याने त्याच्या  फोन पे वरुन पोलीस अंमलदार गणेश खाडे याने दाखविलेल्या मोबाईलमधील स्कॅनरमधील ओंकार अ‍ॅटो गॅरेज यावर १० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर तक्रारदार तरुणाकडे चौकशी केल्यावर पोलीस अंमलदार यांनी सर्वांनी मिळून पैसे घेण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न  झाले. वाघोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अहवालावरुन पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी या तिघा पोलिसांना निलंबित केले आहे.

राज्यात सेक्स स्कॅन्डलच्या इतक्या घटना चर्चेत असल्याचा गैरफायदा घेऊन या पोलिसांनी खंडणी उकळली आहे. प्राचार्यांकडून पैसे उकळणार्‍या पोलीस उपनिरीक्षकांसह तिघा पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, या पोलिसांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही़.

You may have missed