Tilak Road Pune Crime News | पुणे : टिळक रोडवरील दुकानात घुसली भरधाव कार; वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या 19 वर्षाच्या तरुणाचे कृत्य, शटर तोडून 28 फ्रीजचे नुकसान (CCTV Video)
पुणे : Tilak Road Pune Crime News | टिळक रोडवरुन भरधाव जाताना कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या एका १९ वर्षाच्या तरुणाने कार थेट फुटपाथवर चढवून दुकानात शिरली. कारचा वेग इतका जोरात होता की ती फुटपाथवरुन दुकानात घुसली. त्यात दुकानाचे शटर तोडले. त्याच्या आतमध्ये असलेली काच फुटली. तसेच त्याच्या आत असलेले फ्रीजला धक्का बसल्याने आतील २८ फ्रीजचे तब्बल ११ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने त्यावेळी दुकान बंद असल्याने कोणालाही काही लागले नाही.
https://www.instagram.com/reel/DEwY2hvJxfT/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
याबाबत मनमितसिंग हरबनसिंग छाबरा (वय ४७, रा. विद्यासागर कॉलनी, सॅलसबॅरी पार्क) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शिवपुत्र कमलाकर बेळ Shivputra Kamlakar Bel (वय १९, रा. काळेपडळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक या दुकानात रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपुत्र बेळ हा कार घेऊन वेगाने अलका चित्रपटगृहाकडून टिळक रोडने स. प. महाविद्यालयाकडे जात होता. साहित्य परिषद चौकातून पुढे आलेल्यावर त्याने एका वाहनाला वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरुन दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वेगात असल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व कार विरुद्ध बाजूच्या फुटपाथवर चढली. त्यानंतर तिने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक या दुकानाच्या शटरला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की़ दुकानाचे शटर पूर्णपणे निखळले. त्यात शटरनंतर लावलेल्या दोन काचा फुटल्या. आतमध्ये शेजारी शेजारी ठेवलेले २८ फ्रीज, लॅपटॉपचे तब्बल ११ लाख ५२ हजार १२० रुपयांचे नुकसान झाले.
या अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड
यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस हवालदार पाटील तपास करीत आहेत. (Tilak Road Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका