Tingre Nagar Pune Crime News | मॉर्निग वॉक करणार्या महिलेचे गळ्यातील मंगळसुत्र हिसकाविणार्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

पुणे : Tingre Nagar Pune Crime News | मॉर्निग वॉकला जाणार्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र मोटरसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले होते (Chain Snatching) . गुन्ह्यातील दुचाकीच्या नंबरवरुन पोलिसांनी चोरट्याला पकडले आहे. (Chain Snatcher Arrested)
https://www.instagram.com/p/DAYSdaHJxVY
कृष्णा ऊर्फ किशोर अशोक पवार (वय २६, रा. वडगाव घेणंद, आळंदी ता. खेड) असे चोरट्याचे नाव आहे. टिंगरेनगरमध्ये राहणार्या महिला २२ सप्टेंबर रोजी मॉर्निंग वॉकला जात होत्या. सनसाईन हॉॅटेलचे समोरील रोडवर त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्याने हिसकावून नेले होते.
https://www.instagram.com/p/DAYOpWOJeiJ
या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकातील अंमलदार अमजद शेख, संजय बादरे, संपत भोसले व किशोर भुसारे यांना आरोपींनी वापरलेल्या मोपेडचा नंबर मिळाला. तो आळंदी परिसरात रहात असले तांत्रिक विश्लेषणावरुन समजले.
https://www.instagram.com/p/DAYJHl5pG3r
त्यानुसार पोलीस आंळदी परिसरात त्याचा शोध घेत असताना हीच मोपेड घेऊन एक जण जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यामध्ये चोरुन नेलेले मंगळसुत्र ओंकार रमेश चव्हाण (रा. आळंदी) याच्याकडे विक्रीसाठी दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून मंगळसुत्र जप्त केले. या गुन्ह्यातील मंगळसुत्र व वापरलेली मोपेड असा ६६ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
https://www.instagram.com/p/DAX3QlUpT7v
ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिंमत जाधव (DCP Himmat Jadhav),
सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने (ACP Anuja Deshmane), विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव (Sr PI Kanchan Jadhav), पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे (PI Shankar Shalunkhe) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक नितीन राठोड (PSI Nitin Rathod), पोलीस अंमलदार बबन वणवे, यशंवत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DAXtLeKJ63n
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’