Tourist Places In Pune | पर्यटन स्थळावर अपघात होत असल्याने ‘या’ ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पुणे : Tourist Places In Pune | मागील काही दिवसांपासून पर्यटन स्थळावर अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. त्यादृष्टीने वनविभागाच्या वतीने किल्ले सिंहगड (Sinhagad Fort), ताम्हिणी घाट (Tamhini Ghat), भीमाशंकर अभयारण्य (Bhimashankar Forest Reserve) आदी ठिकाणांवर पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे पाऊस असूनही पर्यटकांना आनंद लुटता येणार नाही. पण गर्दीवरील नियंत्रण ठेऊन पर्यटन सुरु ठेवायला हवे अशी मागणी केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्था दिसून येत नाही. त्या ठिकाणच्या व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे, अशी मागणी आमदार सिध्दार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी विधानसभेत केली आहे.
सध्या पाऊस चांगलाच सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु, योग्य काळजी न घेता व्हिडिओ काढण्याच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परिणामी प्रशासनाला सर्व ठिकाणांवर बंदी घालावी लागली आहे. गेल्या महिनाभरात कळसुबाई शिखरावर दोन वेळा पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली.
मागील रविवारी तर एका पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू देखील झाला आहे. तोरणा किल्ल्यावरही एका पर्यटकाचा जीव गेला. तसेच ताम्हिणी अभयारण्यातील दोन धबधब्यांमध्ये तीन पर्यटक वाहून गेले. भुशी धरणाच्या धबधब्यावर पाच जण वाहून गेल्याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला. या घटनांवरून पर्यटन स्थळांवरील गर्दी नियंत्रिण करणे आवश्यक बनले आहे. तसेच पर्यटकांनी देखील पर्यटन करताना योग्य भान ठेवणे गरजेचे आहे.
दरवर्षी हरिश्चंद्र गडावर, किल्ले सिंहगड, राजगड, सांदण व्हॅली, हरिहर गड, तोरणा येथे गर्दी होते. त्या ठिकाणचे अपघात टाळायचे असतील तर गर्दीवर नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी, लोणावळा, ताम्हिणी भागातले धबधबे पाहण्यासाठी गर्दी होते. पण तिथे वन विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे या सरसकट बंदीवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. ज्यांचा पर्यटनावर व्यवसाय आहे, त्यांची याविषयी मागणी आहे.
“पर्यटन स्थळावर गर्दी होत आहे.अनेक अपघात झाले.
त्यामुळे पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांनीच निर्बंध लादले आहेत.
किल्ले सिंहगडावर १४४ कलम लागू असून जमावाने जाण्यावर बंदी आहे”,
अशी माहिती प्रदीप संकपाळ, वन परिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे.
“वन विभागाच्या अंतर्गत अनेक किल्ले व पर्यटन स्थळे आहेत.
पर्यटनाला येताना स्वतःच्या सुरक्षिततेला अधिक महत्व द्यावे.
वन्यजीव क्षेत्रात रात्री जाऊ नये. प्राण्यांना त्रास देऊ नये.
धोकादायक ठिकाणी जाऊ नये अन्यथा आम्ही कठोर कारवाई करू”,
असे महादेव मोहिते, उप वनसंरक्षक, पुणे वन विभाग यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर