Train Cancelled News | 11 ते 24 एप्रिल दरम्यान पुण्याहून सुटणाऱ्या ‘या’ रेल्वेगाड्या रद्द; जाणून घ्या वेळापत्रक

पुणे : Train Cancelled News | पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस आणि पुणे-संत्रागाची-पुणे एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या बिलासपूर विभागामध्ये ‘कनेक्टिव्हिटी’च्या कामामुळे काही दिवस बंद राहतील. या कामाचा सर्वात जास्त परिणाम आझाद हिंद एक्सप्रेसवर होईल. ज्या प्रवाशांनी (Railway Passengers) आरक्षण केले आहे त्यांच्यावर याचा परिणाम होईल.
उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाला आहे आणि रेल्वे प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून बिलासपूर विभागातील रायगड-झारसुगुडा जंक्शनमध्ये कोटारलिया स्थानकावरील चौथ्या मार्गावरील ‘कनेक्टिव्हिटी’चे काम सुरू केले जाणार आहे. हे काम 11 ते 23 एप्रिल दरम्यान सुरू राहणार आहे.
दरम्यान, उन्हाळ्याच्या तीव्रतेत आणि प्रवासी हंगामाच्या सुरुवातीला हे काम हाती घेण्यात आल्याने, काही रेल्वे गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या काळात प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.
रेल्वेगाड्या व रद्द केलेली तारीख ः
- संत्रागाची-पुणे एक्स्प्रेस – 12 आणि 19 एप्रिल रद्द
- पुणे-संत्रागाची एक्स्प्रेस – 14 आणि 21 एप्रिल रद्द
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस – 11 ते 24 एप्रिलपर्यंत रद्द
- हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस – 11 ते 24 एप्रिलपर्यंत रद्द
- हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस – 10, 12, 17 आणि 19 एप्रिल रोजी रद्द
- पुणे-हावडा दुरांतो एक्स्प्रेस – 12, 14, 19 आणि 21 एप्रिल रोजी रद्द