Triple Murder In Maval Pune | पिंपरी: मावळात तिहेरी हत्याकांड; गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू, मृतदेह नदीत टाकताना तिच्या दोन लेकरांनाही नदीत ढकललं

Triple Murder In Maval Pune

पिंपरी : Triple Murder In Maval Pune | पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तिहेरी हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बेपत्ता महिलेचा शोध (Search Of Missing Woman) घेत असताना या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह नदीत टाकत असताना तिची दोन मुले रडू लगाल्याने त्यांना देखील जिवंतपणे नदीत ढकलून दिले. ही धक्कादायक घटना 6 ते 9 जुलै 2024 दरम्यान घडली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी (Talegaon MIDC Police Station) प्रियकरासह दोघांना अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलीस उपायुक्त बापू बांगर (DCP Bapu Banger) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला (Married Woman Missing) बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल करण्यात आलेले होते. सदरच्या चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे (Thane) येथे पाठविले होते. सदर ठिकाणी उपचारादरम्यान नमूद महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराच्या मित्राने सदरची डेड बॉडी व महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येवून तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 9 जुलै 2024 रोजी पहाटे आले. प्रियकराने मित्राच्या मदतीने सदरची डेड बॉडी नदीमध्ये टाकून दिली.

यावेळी महिलेच्या दोन्ही मुलांनी हा प्रकार पाहून रडू लागले. त्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले. या अनुषंगाने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रियकर गजेंद्र दगडखैर (Gajendra Dagdkhair) व त्याचा मित्र रविकांत गायकवाड (Ravikant Gaikwad) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयामध्ये पाठविण्यात आलेले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगांव एमआयडीसी हे करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed