Tulshibaug Ganpati | तुळशीबाग गणपतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ! खा. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते मंजुश्री खर्डेकर, PI विजयमाला पवार, लीना मेहंदळे, अपर्णा आपटे, प्राची महाडकर अगरवाल, रिंकल गायकवाड यांचा सन्मान

Tulshibaug Ganpati

पुणे : Tulshibaug Ganpati | मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव ट्रस्टच्या वतीने ‘तुळशीबाग स्त्रीशक्ती सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. (Tulshibaug Ganpati)

गणेशोत्सवात ‘एक दिवस महिलांचा’ या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा शितोळे, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, डॉ. शैलेश गुजर, महिला विश्वस्त अभिनेत्री वाळके उपस्थित होते.

तुळशीबाग उत्सव मंडपात कार्यक्रम झाला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले. मंजुश्री खर्डेकर (Manjushree Khardekar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार (Sr PI Vijaymala Pawar), लीना मेहंदळे, अपर्णा आपटे, प्राची महाडकर अगरवाल, रिंकल गायकवाड यांचा सन्मान कार्यक्रमात झाला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, तुळशीबाग गणपतीची प्रतिमा असे सन्मानाचे स्वरूप होते.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आपापल्या क्षेत्रात काम कशा पद्धतीने करायचे हे महिला त्यांच्या कर्तृत्वाने दाखवून देतात. राजकीय, शासकीय, सामाजिक अश्या सर्व क्षेत्रात महिला आपली मेहनत आणि वचनबद्धतेने आपला ठसा उमटवितात. मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळात आजही सामाजिक बांधिलकी जपत लोकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे उत्सवाचा हेतू टिकला आहे. खऱ्या अर्थाने समाजाभिमुख असे हे मंडळ आहे.

नीलिमा शितोळे म्हणाल्या, पुण्याच्या गणेशोत्सवाचे तुळशीबाग गणपती हे मध्य आहे.
संस्कृती जपण्याचा प्रयत्न महिला करतात आणि आपला समृद्ध वारसा पुढे नेतात.
त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय हे कौतुकास्पद आहे.

नितीन पंडित म्हणाले, तुळशीबाग आणि महिला यांचे अतूट नाते आहे
त्या अनुषंगाने गणेशोत्सवात ‘एक दिवस महिलांचा’ उपक्रम मंडळातर्फे केला जातो.
या दिवशी उत्सवाचे संपूर्ण व्यवस्थापन महिला सदस्या करतात.
या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुनंदा इप्ते यांनी आभार मानले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला टोला

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed