Two Policeman Dismissed In Pune | ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत ! पोलीस आयुक्तांनी 2 कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ
पुणे : Pune Lalit Patil Drugs Case | ड्रग्ज माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी (Pune Police) सहा ते सात महिन्यांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी दिले आहेत. या प्रकरणात पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते. मात्र, चौकशीत दोषी आढळून आल्याने दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहेत (Two Policeman Dismissed From Service) . या प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह 15 जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेने (pune Crime Branch) तब्बल 3150 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. (Two Policeman Dismissed In Pune)
पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी बडतर्फ केलेल्या दोघांची नावे आहेत. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा ठपका त्यांच्या ठेवण्यात आला असून त्यांना सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथून तो पळून गेला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र, हॉस्पिटलमधून ललित पाटील पळून गेल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती.
चौकशीत धक्कादायक माहिती
ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी नेलं होतं. तिथून तो पळून गेल्यानंतर त्याची माहिती नियंत्रण कक्षाला तब्बल तीन तास उशिराने देण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
दोन्ही पोलीस कर्मचारी ललित पाटील सोबत एक्स-रे काढण्यासाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
या शिवाय घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला दिली असती तर पळून गेलेल्या ललित पाटीलला पकडता आले असते.
मात्र, या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षास न कळवल्यामुळे ललित पाटील याला पळून जाण्यास संधी मिळाली,
असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर