Two Policemen Suspended In Pune | दारु पिऊन गैरवर्तन करणारे काळे पडळ पोलीस ठाण्यातील दोन हवालदार निलंबित

Two Policemen Suspended In Pune | Two constables of Kale Padal Police Station suspended for misbehaving after drinking alcohol

पुणे : Two Policemen Suspended In Pune |  ड्युटीवर असताना दारु पिऊन गैरवर्तन करणार्‍या काळेपडळ पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस हवालदारांना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.

पोलीस हवालदार सचिन सुरेशराव जाधव (Sachin Sureshrao Jadhav) आणि  संजय अंकुश कराड (Sanjay Ankush Karad) अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस हवालदार संजय कराड हे उंड्री पोलीस चौकीत डयुटी अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना ९ मार्च रोजी दुपारी २ वाजता ड्युटी सोडून दारु पिऊन मोटारसायकलवरुन काळेपडळ पोलीस ठाण्याच्या आवारात आले. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेक जण आले होते.  पोलीस ठाण्यातील बाकड्यावर बसलेली तक्रारदार महिला यांच्या पायाला संजय कराड यांनी धडक देऊन त्यांना किरकोळ जखमी केले. इतर तक्रारदारांशी हुज्जत घालून गैरवर्तन केले. ससून रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांनी मद्यार्क सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस हवालदार सचिन जाधव यांना २१ मार्च रोजी दुपारी अडीच ते रात्री नऊ या वेळेत  पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या सोबत लोणी काळभोर येथील एमआयटी येथे परिक्षेच्या बंदोबस्तावर कर्तव्यात नेमण्यात आले होते. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सायंकाळी ६ वाजता बंदोबस्त चेक कला असता सचिन जाधव हे दारु पिऊन गैरवर्तन करताना आढळून आले. ससून रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणी मध्ये त्यांनी मद्यार्काचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोघा हवालदाराना निलंबित करण्यात आले आहे.

You may have missed