UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान! ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार

stock market sell Buy

नवी दिल्ली : UBS Securities Issue Public Notice | ब्रोकरेज हाऊसेस आणि एक्सपर्टच्या सल्ल्यावर डोळे बंद करून शेयर आणि आयपीओमध्ये पैसे लावणार्‍या लोकांसाठी डोळे उघडणारी बातमी आहे. दिग्गज ब्रोकरेज फर्म आणि तज्ज्ञांच्या नावावर काही फसवणूक करणारे गुंतवणुकदारांना चूना लावत आहेत.

यूट्यूब, सोशल मीडिया आणि वेबसाईटद्वारे हे गुन्हेगार मोठमोठ्या ब्रोकरेज हाऊसचा संदर्भ देऊन लोकांना शेयर आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. या बनावट लोकांनी इंटरनॅशन ब्रोकरेज फर्म यूबीएसला देखील सोडले नाही. यूबीएस सिक्युरिटीजने याबाबत गुंतवणुकदारांना सावध केले आहे.

यूबीएसने एक पब्लिक नोटीस जारी करत म्हटले की, आम्हाला समजले आहे की काही अज्ञात आणि अनधिकृत लोक आमचा ब्रँड, लोगो आणि कर्मचार्‍यांचे नाव आणि फोटो लावून बनावट पद्धतीने काम करत आहेत. हे लोक यूबीएस सिक्युरिटीज अथवा यूबीएसच्या नावाने फेक वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा वापर करून गुंतवणुकदारांना बनावट मेसेज पाठवत आहेत.

यूबीएसने पब्लिक नोटीसमध्ये म्हटले आहे की, हे नकली लोक शेयर आणि आयपीओमध्ये कमी काळात हाय रिटर्न देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणुकदारांची दिशाभूल करत आहेत. ब्रोकरेज फर्मने म्हटले, यूबीएस आणि तिच्याशी संबंधित कोणतीही कंपनी भारत आणि परदेशात अशाप्रकारची वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे संचलन करत नाही, ज्यामध्ये गुंतवणुकदारांना शेयर खरेदीसाठी असे प्लॅन ऑफर केले जातात.

यूबीएस सिक्युरिटीज इंडिया, एक लिस्टेड संस्था आहे आणि ट्रेडिंग संबंधीत अशी कामे करत नाही.
आमची ब्रोकरेज फर्म केवळ संस्थेतील गुंतवणुकदारांसाठी ट्रेड करते.
आमचे कर्मचारी देखील अशा प्रकारच्या कोणत्याही कामात सहभागी नाहीत.

यूबीएसने गुंतवणुकदारांना सावध करताना म्हटले की, आमच्या नावाने येणारे मेसेज आणि कॉलबाबत सावध रहा.
कोणत्याही शेयर आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करू नका.

जर कोणी व्यक्ती या बनावट कॉल आणि स्टॉक टिप्सला बळी पडली तर ब्रोकरेज फर्म त्यासाठी जबाबदार राहणार नाही.
जर अशाप्रकारच्या हालचाली दिसून आल्या तर ताबडतोब पोलीस आणि सायबर सेलला कळवा, असे यूबीएसने म्हटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद