Uddhav Thackeray | ‘फक्त मारी बिस्किट आणि खारी बिस्किट’, उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी 24 तासात खरी ठरली; 3 व्हिडिओ समोर
मुंबई: Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना उबाठाचे प्रमुख (Shivsena UBT) उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यानंतर एका सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. ” दाढीवाल्या मिंध्याची कधी तपासणी केल्याचं आम्ही पाहीलं नाही. दाढीवाल्या मिंध्याची, गुलाबी जॅकेटवाल्याची बॅग कधी तपासली नाही. तो तिसरा… तिसरा कोण?” यावर लोकांनी टरबूज, टरबूज अशी घोषणा दिली. त्यावर टरबुजाची कधी तपासणी केलीय का? म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Uddhav Thackeray)
” आम्हाला जे कायदे लागू आहेत, ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांना देखील लागू असले पाहिजेत. नरेंद्र मोदी, अमित शहा यांची येताना नव्हे, तर जातांना तपासणी करा. महाराष्ट्र लुटून ते नेत आहेत”, असे ठाकरे यांनी म्हंटले.
त्यानंतर काल (दि.१२) एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी म्हंटले होते की, लोकसभा निवडणुकीवेळी राऊत यांच्या आरोपांनंतर बॅगा तपासणीचं नाटक झालं. आतासुद्धा तेच होईल. आज, उद्या, परवा या तिघांच्या बॅगांचे व्हिडीओ येतील. आमच्या बॅगेत काही नाही हो. फक्त मारी बिस्किट आणि खारी बिस्किट. हेच दाखवणार ते”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भविष्यवाणी केली होती.
ते पुढे म्हणाले, आता येत्या काही दिवसांत नाटक करणार ते, बघा तुम्ही. आमच्याही बॅगा तपासल्या जातात हे दाखवतील. कायद्यासमोर सगळे समान असं सांगतील. पण मोदी आणि शहांची बॅग तपासली जाते का? मोदीजींची बॅग मागे एकदा ओडिशात तपासली होती. त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं. नंतर ते प्रकरण कॅटकडे गेलं आणि मग ते अधिकारी परत सेवेत आले. पण त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं होतं”, असे ठाकरेंनी म्हंटले.
येत्या काही दिवसांत सत्ताधाऱ्यांकडून बॅगा तपासणीचे व्हिडीओ येतील हे ठाकरेंचं भाकित
चोवीस तासात खरं ठरलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बॅगांच्या तपासणीचे व्हिडीओ समोर आले आहेत.
फडणवीसांच्या बॅगांची तपासणी झाल्याचा व्हिडीओ महाराष्ट्र भाजपकडून शेअर करण्यात आलेला आहे.
त्यांच्या बॅगांची तपासणी यवतमाळमध्ये झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या बॅगांची तपासणी झाल्याचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे.
बारामतीत अजित पवारांच्या बॅगांची तपासणी झालेली आहे.
तर नितीन गडकरींच्या हेलिकॉप्टरची तपासणी लातूरमध्ये झालेली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Chhagan Bhujbal | शिवसेना फोडल्याच्या छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की…’
Pune Cantonment Assembly Election 2024 | प्रभाग 20 मध्ये महायुतीचे सुनील कांबळे यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)