Uddhav Thackeray-Mahavikas Aghadi | ‘किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा’; शिवसेना ठाकरे गटाची भूमिका; महाविकास आघाडीसमोर मोठा पेच?

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Rahul Gandhi

मुंबई : Uddhav Thackeray-Mahavikas Aghadi | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Mahavikas Aghadi) दृष्टिकोनातून इच्छुक उमेदवार मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. सभा, मेळावे , बैठकांचा धडाका त्यांनी लावलेला आहे. लोकसभेप्रमाणेच आता आगामी विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) हे चित्र दिसणार आहे.

दरम्यान महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असणार याबाबत मतमतांतरे येत आहेत. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावेत यावरून चर्चा सुरु होत्या. याबाबत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी स्पष्ट भूमिका मांडत निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या, किती आमदार निवडून येत आहेत पाहून सरकार कोण चालवणार हे ठरवू, असे चव्हाण म्हणाले होते.

त्यानंतर आता ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र ठेवू नका. किमान चार भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, अशी भूमिका उद्धव ठाकरे गटाने घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला तर पाडापाडीचे राजकारण होणार नाही असं ठाकरे गटाला वाटते.

महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी जाहिरपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला आवाहन केले होते. तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगा, मी त्याला पाठिंबा देतो. परंतु निवडणुकीआधी ते जाहीर करावं. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र वापरले तर पाडापाडी होते ते आपल्याला नको असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते. मात्र ठाकरेंच्या मागणीकडे काँग्रेस आणि शरद पवारांनी दुर्लक्ष केले होते.

याआधी युती आणि आघाडीचे राजकारण पाहिले तर ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री या सूत्रामुळे पाडापाडीचं राजकारण होते. महाविकास आघाडीत हा धोका आहे त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला तर रणनीती आखता येईल.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या (Mahavikas Aghadi Seat Sharing) बैठका सुरू आहेत
त्यातच हा निर्णय घेतला जावा अशी ठाकरे गटाची भूमिका आहे.
किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जावा असं ठाकरे गटाला वाटतं.
मात्र काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गटाची भूमिका मान्य करते का हे पाहावे लागणार आहे.

“आपल्यात काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत.
ते म्हणतात की, आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत.
मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो.

जागावाटपावरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे.
भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवले जायचे.
पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या”, असे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना भाष्य केले होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या