Uddhav Thackeray On Badlapur School Girl Incident | ‘मुलीच्या गर्भवती आईला १२ तास बसवून ठेवलं’, उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले – “हे नराधमांचं सरकार आहे का?”
मुंबई : Uddhav Thackeray On Badlapur School Girl Incident | बदलापूरमध्ये दोन लहानग्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजाच्या सर्वच स्तरातून यावर संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. हा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ करत पीडित मुलीच्या पालकांना ताटकळत उभे ठेवत १२ तासांचा अवधी लावला, यावरून आता उद्धव ठाकरेंनी संतप्त होत सरकारवर निशाणा साधला आहे.
नराधमांचं सरकार आहे का? राजकारण आहे म्हणणारेही विकृत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. सुरक्षित बहीण हे प्राथमिकता आहे. जर बहीण सुरक्षित असेल तरच लाडकी बहीण ही योजना (Ladki Bahin Yojana) आणता येईल. २४ ऑगस्टला मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला विनंती करतो की, आपण जात-पात -धर्म हे सर्व बाजूला ठेवून बंदमध्ये सहभागी व्हा. हा बंद माझ्या बहिणींसाठी आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले,, ” आपण जागृत आहोत हे दाखवण्यासाठीचा हा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवू शकतो. उद्रेकाला वाचा फोडण्यासाठीचा हा बंद आहे. राज्यभर निषेध होत असताना मुख्यमंत्री कुठे होते? ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून ही योजना आणली आहे. पण हे विकृती आहे, दुष्कृत्य आहे. एखाद्या घटनेचा निषेध करणं यात राजकारण कधीपासून यांना वाटायला लागलं.”
ते पुढे म्हणाले, ” बातमी वाचण्याचं धाडस माझ्यात नाही.
ही विकृती आली कुठून? मुलीच्या गर्भवती आईला १२ तास बसवून ठेवलं, तिला १०२ ताप आहे,
रुग्णालयात दाखल करावं लागलं. हे सरकार कोणाचं आहे, नराधमांचं सरकार आहे का? आम्ही राजकारण करत नाही.
मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते कोणाच्या बाजुने आहेत?, हे असंवेदनशील सरकार आहे.
जर त्यांना वाटत असेल यात राजकारण आहे तर असं म्हणणारे सुद्धा विकृत आहेत “,
असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे. (Uddhav Thackeray On Badlapur School Girl Incident)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे