Uddhav Thackeray On Constitution | ‘काहींना संविधान फॅशन वाटते, तुम्हाला दाखवतो फॅशन काय असते’, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘… याला लोकशाही म्हणायचे का?’

uddhav-thackeray

मुंबई : Uddhav Thackeray On Constitution | प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेचे पूजन अन् संविधान दिंडी दादर येथे काढण्यात आली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “सर्व भगव्या टोप्या पाहून उत्साहाला उधाण आलंय. भगवा रंग आहेच. भगव्याला कलंक लावणारा जन्माला आलेला नाही आणि येऊच शकत नाही. आज मला अभिमान आहे की, आपण हातात तिरंगा घेऊन आणि भगवी टोपी घालून इथे उभे आहोत. ज्या ज्या वेळेला तिरंग्यावरती संकट आले होते त्या वेळेला आपला महाराष्ट्र म्हणजे भगव्याचा भक्त धावून गेला आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झालीत आणि काही जणांच्या स्वातंत्र्याला एक वर्ष पूर्ण झाले असे वाटतेय”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ” शिवसेना फुटूनसुद्धा अडीच वर्षे झाली. संविधानात कलम १० आहे, पण त्याला कलम म्हणायचे नाही. याला हुकूमशाही म्हणतात. तो निकाल दोन- तीन महिन्यात लागायला हवा होता. तो अद्यापपर्यंत लागलेला नाही. आपल्यापैकी किती जणांनी बॅलेट पेपरवर मतदान केले आहे. मी स्वतः केले आहे. एका कागदावर उमेदवाराचे नाव आणि त्यावर शिक्का मारायचा, त्यामुळे आपले मत कुठे जाते हे आपल्याला कळत होते. मी या देशाचा नागरिक आहे, मला मतदानाचा अधिकार आहे, त्यामुळे माझे मत कुठे जात आहे हे मला कळले पाहिजे.

पण आता आपण बटन दाबतोय आणि दिवा पेटतो आणि आवाज येतोय. त्यामुळे व्हीव्हीपॅटचीसुद्धा रिसीट दिसते. ती खाली जातसुद्धा असेल पण माझे मत आज नोंदणीकृत कुठे आणि कसे झाले हे मला कळण्याचा अधिकार होता. पण तो सरकारने काढून घेतला आहे. पण ती पावती केराच्या टोपलीत जात असेल, याची मतमोजणी होत नसेल, तर याचा काय उपयोग? त्याहून भयानक आहे की, मतदार केंद्रातला व्हिडीओ शूटिंग तुम्ही मागितले तर तुम्हाला मिळणार नाही, याला लोकशाही म्हणायचे का?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, “काही लोकांना स्वातंत्र्याची किंमत नाही, घरादारावर निखारा ठेवून स्वातंत्र्य मिळवले त्याची किंमत नाही. ते ना स्वातंत्र्य लढ्यात उतरले, ना संयुक्त मराठीसाठी उतरले. संविधान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले, काहींना संविधान फॅशन वाटते, तुम्हाला दाखवतो फॅशन काय असते. बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांची जागा त्यांना दाखवून दिलीच पाहिजे.

२५ जानेवारी हा मतदार दिन होता. कसं मतदान झालंय हे सगळ्यांनीच पाहिलंय.
ईव्हीएममध्ये घोटाळा होतोय, सत्ताधारी सर्व यंत्रणा हातात घेऊन घोटाळे केले जात आहेत.
लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा भाजपाला ४०० पार जागा पाहिजेत, असे म्हणत होते.
म्हणजे त्यांना संविधान बदलायचे आहे,
असा त्यांचा डाव होता “, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed