Uddhav Thackeray On PM Narendra Modi | ‘महाराजांची माफी मागताना मोदींच्या चेहऱ्यावर मग्रुरी’ ,उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा; म्हणाले – “बेकायदा सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया…”

Uddhav Thackeray

मुंबई : Uddhav Thackeray On PM Narendra Modi | मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed). राज्यातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महायुती सरकारविरोधात (Mahayuti Govt) ‘जोडे मारो आंदोलना’ची हाक दिली आहे. (MVA Jode Maro Andolan)

गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India Mumbai) जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. चुकीला माफी नाही असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्ताधारी आमच्यावर टीका करत आहेत की आम्ही राजकारण करत आहोत. पण ते राजकारण करत नसून गजकर्ण आहे. शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालंय. खाजवत बसत आहेत.

पण या चुकीला माफी नाही. आणि मुद्दामहून मनातील संताप व्यक्त करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया म्हणजे देशाचं प्रवेशद्वार येथे जमलो आहे. हे शिवद्रोही सरकारला, बेकायदा सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ” देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले आणि माफी मागितली. माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने शिल्लक ठेवलं असतं?. पण माफी मागतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही. व्यासपीठावर एक शहाणा, दोन दीड शहाणे म्हणजे एक फुल-दोन हाफ बसले होते. त्यातील एक हाफ हसत होता.

महाराजांची तुम्ही एवढी थट्टा करता. तुम्हाला काय वाटतं? मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली? पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याकरता मागितली? निवडणुकीसाठी तुम्ही सिंधुदुर्गात आला होता. आम्हाला अभिमान वाटला होता की नौदल दिन माझ्या महाराष्ट्रातील किनारपट्टीवर साजरा होत आहे.

हा कार्यक्रम दिमाखदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्ट्राचार करून पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की मोदी गॅरंटी. हीच ती मोदी गॅरंटी, हात लावीन तिथे माती होईल”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी मालवणच्या घटनेवर माफी मागितली.
ते म्हणाले, ” काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे.
शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत.

मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो.
तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत.
मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो.” (Uddhav Thackeray On PM Narendra Modi)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed