Uddhav Thackeray On Vinod Tawade | उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल; म्हणाले – “विनोद तावडेंची बॅग कोण तपासणार?”

Uddhav Thackeray - Vinod Tawade

तुळजापूर: Uddhav Thackeray On Vinod Tawade | विधानसभा निवडणूक मतदानाच्या काही तास आधी विरारमध्ये मोठा राजकीय राडा झाला आहे. विरारमध्ये विनोद तावडे यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरले. तावडे यांनी पाच कोटी वाटल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. त्याशिवाय त्यांच्याकडील डायरीमध्ये १५ कोटींची नोंद असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला. (Maharashtra Assembly Election 2024)

विनोद तावडे यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले. या प्रकरणावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. मविआचे सरकार येऊ दे, असे साकडे ठाकरेंनी यावेळी तुळजाभवानी चरणी घातले. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विनोद तावडेंवर झालेल्या आरोपवर प्रतिक्रिया दिली. माझी बॅग आजही तपासली गेली. विनोद तावडे यांची बॅग कोण तपासणार..? असा थेट सवाल ठाकरेंनी यावेळी केला.

“माझी बॅग आजही तपासली गेली, विनोद तावडे यांची बॅग कोण तपासणार? नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्यावर दगड हल्ला झाला. दगड तपासण्याचं काम कोण करणार?”, असा घणाघात ठाकरे यांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed