Uddhav Thackeray | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते जाहीर

मुंबई : Uddhav Thackeray | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते बुधवारी (९ एप्रिल) जाहीर करण्यात आले. मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
प्रसार माध्यमांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी या शिवसैनिकांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेनेच्या सेन्ट्रल कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. तसेच, सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका ही उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वेळोवेळी मांडत असतात, असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले.
पदाधिकारी निवड अशी…
मुख्य प्रवक्ते –
- खासदार संजय राऊत
- खासदार अरविंद सावंत
प्रवक्ते –
- शिवसेना नेते अॅड. अनिल परब
- शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी
- शिवसेना जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान
- शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
- आनंद दुबे
- जयश्री शेळके