Udyam Vikas Sahakari Bank | दिनदर्शिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार घरोघरी पोहोचविणे स्तुत्य – रवींद्र वंजारवाडकर
उद्यम सहकारी बँकेच्या 2025 सालाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
पुणे : Udyam Vikas Sahakari Bank | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात उद्यम विकास सहकारी बँक, पुणे ने “रा.स्व.संघाबद्दल” माहिती देणारी दिनदर्शिका काढली आणि ह्या माध्यमातून संघ विचार घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प केला हे स्तुत्य असल्याचे गौरवोदगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी काढले. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, बँकेचे अध्यक्ष सीए. दिनेश गांधी, उपाध्यक्षा लीनाताई अनास्कर, माजी अध्यक्ष व संचालक संदीपजी खर्डेकर, बँकेचे संचालक सीए अभय शास्त्री, राजाभाऊ पाटील, शैलेश टिळक, मनोज नायर व जयंत काकतकर उपस्थित होते.
दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर संघाची प्रार्थना तिच्या अर्थासहीत व आतील पानांवर आजवरच्या संघाच्या सहा सरसंघचालकांची छायाचित्रे व त्यांची माहिती तर अन्य पानांवर विश्व हिंदू परिषद, राष्ट्रसेविका समिती, सहकार भारती, वनवासी कल्याण आश्रम व आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू संघटनाचे कार्य करणाऱ्या हिंदू स्वयंसेवक संघ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख संघटनांची माहिती दिली असल्याचे बँकेचे अध्यक्ष सीए दिनेश गांधी व संचालक श्री.संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
उद्यम विकास सहकारी बँकेच्या संचालक व कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हे प्रेरणास्रोत असून आम्ही सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सचोटीने व ग्राहकोन्मुख दृष्टिकोनातून बँकेचा व्यवसाय करण्यावर भर देतो असे बँकेचे अध्यक्ष सीए.दिनेश गांधी म्हणाले. (Udyam Vikas Sahakari Bank)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत