Unauthorised Schools In Pune | पुणे जिल्ह्यातील 13 अनधिकृत शाळांना कुलुप तर 10 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल; झेडपीची कारवाई
पुणे : Unauthorized Schools In Pune | पुण्यात एकूण ४९ शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते. अनधिकृत शाळांपैकी १३ शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कुलूप लावले आहे. त्यातील १० शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अन्य १२ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे (Pune Zilla Parishad) प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे (Sanjay Naikade) यांनी दिली. (Pune ZP Education Officer)
चालू शैक्षणिक वर्षात जाहीर करण्यात आलेल्या एकूण ४९ अनधिकृत शाळांपैकी पाच शाळांना मान्यता मिळाली आहे. उर्वरित ४४ शाळांपैकी ३ शाळांना राज्य सरकारकडून इरादा पत्र मिळाले आहे. दोन शाळांनी दंड भरला असून अन्य चार शाळांनी जिल्हा परिषदेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले आहे. आणखी १२ शाळांवर कारवाई करणे बाकी आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे व पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ अनधिकृत शाळांची यादीच १० जुलै रोजी जाहीर केली होती. या यादीतील १३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. बंद करण्यात आलेल्या १३ शाळांमध्ये पुणे शहरातील तीन, पिंपरी चिंचवडमधील दोन आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठ शाळांचा समावेश असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले. (Unauthorized Schools In Pune)
बंद करण्यात आलेल्या शाळा खालीलप्रमाणे,
पुणे शहर- केअर फाउंडेशन पुणे संचलित अमॅन्युअल पब्लिक स्कुल, स्कूल, महंमदवाडी रोड, हडपसर, सोनाई इंग्लिश मीडियम स्कूल, फुरसुंगी, संस्कृती इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव खुर्द.
पिंपरी चिंचवड – माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी आणि श्री. चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल विशाल नगर, पिंपळे निलख.
ग्रामीण जिल्हा – किडजी स्कूल शालीमार चौक दौंड, जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशू विकास कासुर्डी, ता. दौंड , यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल सोनवडी ता. दौंड, भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मोई, ता. खेड, श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय कुंजीरवाडी, ता. हवेली, रिव्हस्टोन इंग्लिश मीडियम स्कूल, पेरणे फाटा, ता. हवेली, श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर, गहुंजे, ता. मावळ आणि व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल, नायगाव, ता. मावळ.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्या शाळा खालीलप्रमाणे,
जिझस क्राईस्ट इंग्लिश मीडियम स्कूल खामशेत, ता. मावळ
किंग्ज वे पब्लिक स्कूल, रायवूड, लोणावळा, ता. मावळ
इ.एम.एच. इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी, ता. हवेली
रामदरा सिटी स्कूल. रामदरा, लोणी काळभोर, ता. हवेली
ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, उंड्री, ता. हवेली
लिट्ल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर
ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, लिंक रोड, चिंचवड
आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळे गुरव
पीपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट गांधीनगर, पिंपळे निलख
तक्वा एज्युकेशन ट्रस्ट संचलित टीम्स तक्वा इस्लामिक स्कूल एंड मक्तब, कोंढवा खुर्द, पुणे
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद