UP Crime News | दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध, मोबाईलमधील बायकोचं ‘डार्क सिक्रेट’ ओपन झालं, कॉफीमध्ये विष घालून नवऱ्याला प्यायला दिलं, कॉफी पिताच नवरा कोसळला

उत्तरप्रदेश : UP Crime News | मोबाईलमधील ‘डार्क सिक्रेट’ ओपन झाल्याने पत्नीने पतीला कॉफीमध्ये विष घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. अनुज शर्मा (वय-२६) असे पतीचे नाव असून पिंकी शर्मा उर्फ सना असे पत्नीचे नाव आहे. ही घटना मुजफ्फरनगरमधल्या खतौली कोतवाली परिसरातील भयांगी गावात घडली आहे.
दोन वर्षांपूर्वी गाजियाबाद्च्या लोणी पोलीस स्टेशन परिसरातील फरखनगर येथील रहिवासी पिंकी शर्मा उर्फ सना हिच्याशी झाला होता. अनुज मेरठच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये काम करतो. लग्नानंतर काही महिन्यांतच अनुज आणि पिंकीमध्ये वाद सुरू झाले. असा आरोप आहे की पिंकी मोबाईलवर दुसऱ्या मुलाशी बोलायची, त्यामुळे अनुज आणि पिंकीमध्ये वारंवार भांडणे होत होती.
अनुजची मोठी बहीण मीनाक्षीचा आरोप आहे की, पिंकीचे लग्नापूर्वी दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही ती त्याच्याशी मोबाईलवर बोलत असे. अनुजने पिंकीला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यात सुधारणा झाली नाही. जेव्हा जेव्हा तो कामावर जायचा तेव्हा पिंकी त्या मुलाशी तासनतास बोलत राहायची. एके दिवशी अनुजने पिंकीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्या मुलासोबतचे संभाषण आणि फोटो पाहिले.
अनुजची बहीण मीनाक्षीने आरोप केला आहे की, २५ तारखेच्या संध्याकाळी पिंकीने अनुजच्या कॉफीमध्ये विष मिसळले आणि त्याला मारण्याच्या उद्देशाने ते प्यायला लावले. ही कॉफी प्यायल्यामुळे अनुजची प्रकृती बिघडली आणि त्याला मेरठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनुजची मोठी बहीण मीनाक्षी हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंकीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.