UP Crime News | वर्षभरापूर्वी प्रेमविवाह ! गळा दाबून रेल्वे कर्मचारी असलेल्या पतीचा खून, हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा रचना बनाव; पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सत्य उघडकीस

उत्तरप्रदेश : UP Crime News | पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर पत्नीने पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. परंतु पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सत्य समोर आले आहे. दीपक कुमार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बिजनौरच्या नजीबाबाद येथील ही घटना आहे. नोकरी आणि फंडासाठी भावाची हत्या केल्याचा आरोप दीपकच्या भावाने वहिनीवर केला आहे.
अधिक माहितीनुसार, रेल्वे कर्मचारी असलेल्या दीपक कुमारचा शिवानी सोबत १७ जानेवारी २०२४ रोजी प्रेमविवाह झाला होता. त्यानतंर दीपक पत्नीसह नजीबाबादच्या आदर्श नगर येथे भाड्याने राहू लागला. शुक्रवारी दुपारी शिवानीने पती दीपकला हार्ट अटॅक आल्याची माहिती सासू आणि दिराला दिली. पतीला खासगी हॉस्पिटल आणि तिथून सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणले गेले. जिथे डॉक्टरांनी त्यांना भरती केले नाही. बिजनौर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये दीपकला मृत घोषित करण्यात आले. पतीचे पोस्टमार्टम होऊ नये असे पत्नी शिवानी म्हणत होती. परंतु कुटुंबाने दीपकच्या गळ्याभोवती खूणा पाहून पोस्टमार्टम केले.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दीपकचा मृत्यू हार्ट अटॅकने नव्हे तर गळा दाबून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी पत्नी शिवानीला पकडून खाकीचा धाक दाखवताच तिने हत्येची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, एका रस्सीने दीपकचा गळा दाबला आहे. ज्यावेळी घटना घडली तेव्हा तो काहीतरी खात होता. पोस्टमार्टममध्ये त्याच्या गळ्यात खाद्यपदार्थ अडकल्याचे दिसून आले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.