UPSC Chairperson Manoj Soni Resignation | IAS पूजा खेडकर प्रकरणाची कारवाई सुरु असतानाच UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा

Manoj Soni

पुणे : UPSC Chairperson Manoj Soni Resignation | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Puja Khedkar) यांनी बनावट ओळखपत्र (Fake ID Of Puja Khedkar) सादर केल्याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच पूजा खेडकर यांचे आयएएस केडर रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. यूपीएससीने, पोलिस अधिकाऱ्यांकडे एफआयआर दाखल करून फौजदारी खटल्यासह तिच्याविरुद्ध अनेक प्रकरणात कारवाई सुरू केली आहे. यासोबतच नागरी सेवा परीक्षा- 2022 च्या नियमांनुसार पूजा खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा- 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासाठी / भविष्यातील परीक्षांमधून काढून टाकण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. (UPSC Chairperson Manoj Soni Resignation)

हे प्रकरण सुरु असतानाच आता UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आलेली आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली आहे. मनोज सोनी यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. सोनी यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी 2022 मध्ये निवड झाली होती. त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना राजीनामा दिलेला आहे.

सोनी यांनी यूपीएससी च्या अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून 2017 ते 2023 या कालावधीत काम केले होते. त्यापूर्वी सोनी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ , महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा याठिकाणी कुलगुरू म्हणून काम केले आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्याची माहिती समोर येतेय.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed