Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय
उरण : Uran Raigad Crime News | रायगड जिल्ह्यातील उरण येथे एका २२ वर्षीय तरुणीचा चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव यशश्री शिंदे (Yashshree Shinde) असून तिचा मृतदेह येथील एनआय स्कूलजवळ (NI School Uran) आढळला. आरोपीचा शोध पोलिस घेत असून तो बंगलोर येथे पळून गेल्याचे तपासात समजले आहे. (Uran Raigad Murder Case)
दरम्यान, आरोपी हा अल्पसंख्यांक समाजातील असल्याने उरण येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यशश्री शिंदेची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
आज पहाटे उरण पोलिसांना तरुणीच्या मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तरुणीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात (Indira Gandhi Rural Hospital Uran) शवविच्छेदनासाठी पाठवला.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते (Sr PI Rajendra Kote) यांनी म्हटले की,
यशश्री शिंदे ही २५ जुलैपासून बेपत्ता होती. आम्ही लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ. नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक
Pune Flood | पुणेकरांनो काळजी घ्या, शहरात पुराच्या दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका!
पुणे महापालिकेने केले आवाहन
Sharad Pawar On Maratha-OBC Reservation | मराठा-ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांनी
व्यक्त केली चिंता, ”तेथील कटुता, अवविश्वासाचं चित्र भयावह, मी कधीही असं…”