Uttam Nagar Pune Crime News | 13 वर्षाच्या मुलावर वस्तार्याने केले वार; खेळण्यास आल्याने केले कृत्य
पुणे : Uttam Nagar Pune Crime News | सोसायटीत खेळण्यासाठी आलेल्या मुलाला तू येथे खेळायला का आलास असे म्हणून १३ वर्षाच्या मुलावर वस्तार्याने वार करुन जखमी करण्याचा प्रकार कोंढवे धावडे येथे घडला. या घटनेत समर गजानन जाधव (वय १३) हा जखमी झाला आहे. (Stabbing Case)
याबाबत अखिल गजानन जाधव (वय ४०, रा. विक्रोळी, वेस्ट, मुंबई) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र सोपान बिडकर (वय ५५, रा. भैरवनाथ नगर, कोंढवे धावडे) याला अटक केली आहे. ही घटना कोंढवे धावडे येथील अन्सारी हाऊस बिल्डिंग समोरील जागेत शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा मुलगा समर हा खेळण्यासाठी खाली गेला होता. राजेंद्र बिडकर याने समर यास तू येथे खेळायला का आलास असे म्हणून वस्तार्याने त्याच्या डाव्या गालावरील डाव्या डोळयाच्या खाली व डाव्या कानाच्या वरील बाजूस वार करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक रायगौंडा तपास करीत आहेत. (Uttam Nagar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य