Uttam Nagar Pune Crime News | एकांत किनारा हॉटेलवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद ! चौघांना अटक, पिस्टल, काडतुसांसह कोयता जप्त

पुणे : Uttam Nagar Pune Crime News | मुठा नदीच्या (Mutha River) किनार्यावर उभारण्यात आलेल्या एकांत किनारा हॉटेलवर (Kinara Hotel) दरोडा टाकण्यासाठी (Robbery Case) जमलेल्या टोळक्यांना उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar) पकडले. त्यांच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुस, कोयता जप्त करण्यात आला आहे. (Uttam Nagar Pune Crime News)
वैभव नारायण गौडी (वय २०, रा. इंगळेनगर, वारजे जकात नाका, वारजे), ओम राजेश व्हावळ (वय २१, रा. साईलिला अपार्टमेंट, वारजे), हर्षल प्रदिप वरघडे (वय २०, रा. लक्ष्मीनिवास, श्रमिक वसाहत, कर्वेनगर) आणि स्वप्निल भगवान कांबळे (वय १९, रा. मावळे आळी, कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महादेव श्रीरंग झाडे (वय १९, रा. कर्वेनगर लेन नं. १, वारजे), बालाजी ऊर्फ टप्या राजकुमार कांबळे (वय १८, रा. नर्हे), ऋषिकेश किसन मेणे (वय २०, रा. कर्वेनगर) आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वैभव गौडी याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapeeth Police) ठाण्यात खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा २०२१मध्ये दाखल झाला होता. वैभव व ओम व्हावळ यांच्यावर वारजे माळवाडी पोलीस (Warje Malwadi Police) ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलीस अंमलदार दीपक कांबळे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मांडवी खु. गावाच्या स्मशानभूमीजवळ नदी किनार्यावर एकांत किनारा हॉटेल उभारण्यात आले आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक शनिवारी रात्री गस्त घालत असताना एकांत किनारा हॉटेलवर दरोडा टाकण्यासाठी काही जण जमले आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेल शेजारी अंधारात जमलेल्या टोळीवर छापा टाकला. त्यात चौघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुस, कोयता, मिरची पुड, नायलॉन दोरी, स्कु ड्रायव्हर असे साहित्य जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग