Uttam Nagar Pune Crime News | पुणे: ‘दादा’ म्हणत घरातून बाहेर घेऊन जाऊन कोयत्याने वार करुन खून; उत्तमनगरमधील घटना

पुणे : Uttam Nagar Pune Crime News | घरात झोपलेला असताना दादा पोत उचलायला जायचे असे म्हणून तो बाहेर घेऊन गेला आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्याचा खून केला. ही घटना उत्तमनगर मधील मासे आळीमध्ये रविवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. (Murder In Uttam Nagar Pune)
जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (वय २२) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. उत्तमनगर पोलिसांनी अमित सुदाम गुजर (वय २१,रा. मासे आळी, उत्तमनगर) याला अटक केली आहे. (Uttam Nagar Pune Crime News)
याबाबत लक्ष्मी ज्ञानेश्वर भोंडेकर (वय ४२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप भोंडेकर हा दहावी झाल्यानंतर घरीच होता. रविवारी दुपारी तो घरी झोपला होता. दुपारी साडेबारा वाजता अमित गुजर हा घरी आला. त्याने जयदीपला झोपेतून उठवून पोत उचलायचे आहे, असे सांगून बोलावून घेऊन गेला. काही वेळाने घराबाहेर लोक ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी यांनी बाहेर जाऊन पाहिले. तेव्हा मित्रांनी जयदीपच्या डोक्यात कोयता मारला आहे, असे सांगितले. फिर्यादी या जुनी मासे आळी येथील राजेंद्र पवार यांच्या घरासमोर आले. तेथे जयदीप रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
त्याच्या डोक्यात मारलेला कोयता बाजूला पडला होता. जयदीप याने मला अमित गुजर याने डोक्यात कोयता मारल्याचे फिर्यादी यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी जयदीपला संजीवनी हॉस्पिटलला नेले. जास्त जखम असल्याने त्यांनी दुसर्या हॉस्पिटलला येण्यास सांगितले. जयदीप याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन अमित गुजर याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक चवरे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा